Simple And Quick Homemade Mix Vegetable Pulao. Easy Recipe By Gharcha Swaad.
साहित्य – ४०० ग्रॅम बासमती तांदूळ, २०० ग्रॅम फ्लॉवर भाजी, १ कप किंवा १०० ग्रॅम हिरवा ओला वाटाणा, १ कप किंवा १०० ग्रॅम टेंडळी, १ कप किंवा १०० ग्रॅम फरस-बी, ½ कप गाजर, ( खडा मसाला – ४/५ तेजपत्ता, ३ मसाला वेलदोडे, ४ हिरवे वेलदोडे, १½” दालचीनी, ७/८ लवंगा, १५ काळीमिरी. ) १ tea spn जीरे, ½ tea spn हिंग, १ tea spn हळद, ½ tbl spn घरगुती गरम मसाला, ५ हिरव्या मिरच्या पात्तळ उभ्या काप केलेल्या, ३ कांदे उभे काप केलेले, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ tbl spn ठेचलेले आले लसूण किंवा पेस्ट, सोयीनुसार तेल, भात उकळण्यासाठी पाणी ५ ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ.
रायत्यासाठी साहित्य – २०० ग्रॅम दही, १½ कप खारी बुंदी, ½ कप टोमॅटो काप केलेले, ½ कप बीट काप केलेला, ½ कप गाजर काप केलेले आणि १ tea spn मीठ.
कृती – एका कढईत २ tbl spn तेल तापवून त्यात खडा मसाला परतून घ्यावा. एका बाजूला पाणी उकळत ठेवावं. मसाला परतून झाल्यानंतर त्यात बासमती तांदूळ घालावा. ( बासमती तांदूळ प्रथम चांगला धुवून घ्यावा. ) तांदूळ खडा मसाल्यासोबत परतून घ्यावा. परतून झाल्यानंतर यात गरम पाणी घालून चवी पुरता मीठ घालावं आणि भात ८०% शिजवून घ्यावा.
आता एका बाजूला भाजीची तयारी करून घ्या. एका कढईत ७ tbl spn तेल घालून गरम करून घ्या. आता यात जीरे, हिंग, काप केलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्यावं. परतून झाल्यावर यात हळद, घरगुती गरम मसाला घालून पुन्हा परतून घ्यावं. आता यात मिक्स भाज्या घालाव्यात, २ tbl spn दही आणि चवीनुसार मीठ घालून संपूर्ण भाज्या एकजीव कराव्यात. आता वर झाकण ठेवून २० मिनिटे मंद आचेवर १०-१० मिनटे अंतर ठेवून वाफवून घ्याव्यात. भात ८०% शिजल्यानंतर आतले पाणी घालून वेगळा करावा. तयार शिजलेल्या भाज्या ८०% शिजलेल्या भातामध्ये घालून एकजीव कराव्यात. ( जर दही उरले असेल तर तेही या भातामध्ये मिक्स करून घ्यावे. ) आता एकजीव करून झाल्यानंतर वर झाकण ठेवून पुलाव ५ मिनिटे मंद आचेवर वाफ काढून घ्यावा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करून गरमागरम मिक्स व्हेजिटेबल पुलाव वाढून घ्यावा.
रायत्याची कृती – एका मोठ्या वाडग्यात बुंदी भिजवून घ्यावी. आता यात टोमॅटो, बीट, गाजर, दही आणि १ tea spn मीठ घालून एकजीव करून घ्यावं. ( यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीही घालू शकता. ) बुंदी रायता तय्यार. हा रायता पुलाव सोबत सर्व्ह करावा.
#VegPulaoRecipe #SimpleMixVegetablePulaoInMarathi #HomemadePulav
If you liked the video, Please Like & Share.
…………………………………………………………………………………………………..
Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/
Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad
For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Video Rating: / 5